शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

Sharad Pawar: नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना

By निलेश राऊत | Updated: July 3, 2023 09:21 IST

मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती...

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाबंडानंतर पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणी करण्याचा निर्धार करून, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी सकाळी आठ वाजता कराडकडे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाकडे दर्शनासाठी रवाना झाले.

मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. सर्वात प्रथम खासदार ऍड. वंदना चव्हाण हे या ठिकाणी आल्या. त्यानंतर पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे ही याठिकाणी आले. तसेच बीडचे आमदार संदीप शिरसागर, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कमल ढोले पाटील, उल्हास ढोले पाटील, माजी नगरसेवक निलेश मगर, उदय महाले, रवींद्र माळवदकर, भगवानराव साळुंके, काका चव्हाण, दीपक जगताप, गणेश नलावडे, आदी प्रमुख पदाधिकारी मोदीबाग येथे दाखल झाले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ऍड वंदना चव्हाण यांनी, कालची घटना ही खूपच वाईट घडली असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी आपलं मन काय म्हणतंय ते ऐकलं पाहिजे. मी स्वत: शरद पवारांसोबत कायम राहणार असून, शरद पवारांसोबत मी पण कराडला जाणार आहे. आजपासून नव्या जोमाने आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीला सुरुवात करणार आहोत.

आमदार रोहित पवार म्हणाले, अजित पवार भाजप सोबत जातील असे वाटलं नव्हतं, मात्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार हे काहीसं लक्षात आले होते असे सांगितले. आता ही संघर्षाची वेळ आहे. येत्या ५ तारखेला आम्ही सर्व आमदार भेटणार होतो, पण आज राजकारणात येऊन चूक झाली का अशी भावना मनात येत आहे. परंतु, पक्ष फुटला तरी आम्ही लढत रहाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे