Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांना काल पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता डॉ. परवेझ ग्रॅण्ट यांनी पवार यांच्या तब्येतीची अपडेट दिली. 'शरद पवार यांची तब्येत सध्या चांगली आहे, त्यांच्यावरती सगळे उपचार योग्य करण्यात आले आहेत आणि आता ते विश्रांती घेत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
शरद पवार यांनी कालपासून त्यांनी व्यवस्थित जेवण केले असून त्यांची तब्येत आता पूर्णपणे 'रिकव्हर' झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात विश्रांती घेत आहेत.
...तर शरद पवार राज्यसभेवर जातील; रोहित पवारांचे मोठे संकेत, अजित पवारांवर म्हणाले...
सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल समाधानकारक असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
४८ तासांत डिस्चार्ज
येत्या ४८ तासांमध्ये शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. “पवार साहेबांची तब्बेत आता एकदम चांगली आहे. त्यांनी चांगला आराम केला आहे आणि परवा ते घरी जाणार आहेत. ते पुढचे काही दिवस पुण्यात राहणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला परत जाणार आहेत. पुढेच दोन दिवस त्यांना आराम करावा लागणार आहे. ते व्यवस्थित खात आहेत. चांगला नाश्ता करत आहेत आणि सर्व काही ठिक आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.
खासदार शरद पवार यांना काल अचानक उलट्या सुरु झाल्या होत्या. उलट्या होत असल्यामुळे त्यांना डीहायड्रेशन झाले होते. त्यांना सलाइन लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. तसेच सिटीस्कॅन देखील करण्यात आले आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
Web Summary : Sharad Pawar's health is stable after treatment at Ruby Hospital. Doctors report positive progress and satisfactory test results. He is resting well, eating properly, and expected to be discharged within 48 hours. No cause for concern, doctors confirmed.
Web Summary : रूबी अस्पताल में इलाज के बाद शरद पवार का स्वास्थ्य स्थिर है। डॉक्टरों ने सकारात्मक प्रगति और संतोषजनक परीक्षण परिणामों की सूचना दी। वह अच्छी तरह से आराम कर रहे हैं, ठीक से खा रहे हैं, और 48 घंटों के भीतर छुट्टी मिलने की उम्मीद है। चिंता की कोई बात नहीं, डॉक्टरों ने पुष्टि की।