शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेबां’च्या विरोधानंतर राेहित पवारांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती; अजित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 13:11 IST

कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते...

बारामती (पुणे) : २०१७ मध्ये राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी रोहित पवार यांना उमेदवारी देण्याची आपल्याकडे मागणी केली. पण ‘साहेबां’नी त्याला विरोध केल्यावर राेहित पवार यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली. मात्र, आपण साहेबांचे न एकता रोहित पवारांना उमेदवारी दिली. निवडून आल्यावर मलाच साहेबांची बोलणी खावी लागली. त्यानंतर राेहित पवार यांनी हडपसरला विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तेथील राजकीय गणिते पाहता आपणच कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्यास सुचविल्याचा दावा अजित पवार यांनी यावेळी करीत आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी युगेंद्र पवार आणि रोहित पवार या दोन्ही पुतण्यांवर निशाणा साधला. यावेळी पवार म्हणाले, बारामती परिसरातील साखर कारखाने इतरांनीच काढले, शहरातील संस्था फार पुर्वीपासुनच अस्तित्वात होत्या. आप्पासाहेब पवार यांनी दुधधंदा वाढविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आमचे चिरंजीव खुशाल सांगतात. ‘ हे सगळं साहेबांनी केलं’. तुमचा जन्म सुध्दा झाला नव्हता आणि तुम्ही धडधडीत खोटं बोलता, सगळं साहेबांनीच केलं, मग ३२ वर्ष आम्ही काय केले, शब्दात अजित पवार यांनी त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, मंगलदास बांदल, वासुदेव काळे, सुरेंद्र जेवरे, अॅड सुधीर पाटसकर आदींची भाषणे झाली. यावेळी सभेसाठी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिप होते. १९८९ मध्ये  काहीजण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मला लोकसभा उमेदवारी मिळावी म्हणुन गेले होते.मात्र, ‘साहेबां’नी त्यांना ‘मी जातो काटेवाडीत शेती करायला,त्याला राजकारणात पाठवा,असे सुनावले.त्यानंतर माझ्यासाठी उमेदवार मागायला गेलेली लोक तोंडात मारल्याप्रमाणे माघारी आल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली.

घड्याळाच्या प्रचारामुळे निलंबन-

मतदानासाठी माझ्याकडून धमकावले जात असल्याचे काहीजण बोलतात. मात्र, आपण कोणाला मतासाठी धमकावत बसलो असतो तर लोकांना एवढ्या मतांनी निवडून दिले असते का, असा सवाल केला. शारदानगर परिसरात काय चाललेय बघा, एका शिक्षिकेच्या मुलाने घड्याळाचा  प्रचार करीत असल्याचे कारण सांगत त्या शारदानगरच्या शिक्षिकेला कामावरुन कमी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. काहीजण दिल्लीत आम्ही दोघेच नडतो, असे म्हणतात. पण मतदारसंघाचे काय, मतदारसंघासाठी विश्वास संपादन करुन कामे करावे लागते. नडून चालत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारlok sabhaलोकसभाBaramatiबारामतीbaramati-pcबारामती