शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:22 AM

पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले.

पुणे : ‘पथनाट्याची शिदोरी’ हेच माझ्या आजवरच्या अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले.सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते.मकरंद अनासपुरे यांच्या बरोबरच अभिनेते सुबोध भावे यांना देखील निमंत्रित केले होते. आयुष्यात ठरवून केलेल्या गोष्टींपेक्षा न ठरवता केलेल्या गोष्टी जास्ती यशस्वी होतात असा माझा अनुभव असल्याचे सुबोध भावे यांनी नमूद केले.मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, २००८ मध्ये एका चित्रपटातील त्यांनी केलेली शेतकऱ्याची भूमिका ही नाम फाउंडेशनच्या निर्मितीची प्रेरणास्थान ठरली. या संस्थेने शेतकºयांच्या मदतीसाठी आयोजित केलेला पहिला कार्यक्रम हा बीड येथे, तर दुसरा नागपूर येथे पार पडला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवले व सध्या ही संस्था एकूण ३६ वेगवेगळ्या हेड्स खाली काम करते आहे. किलोमीटरच्या भाषेत सांगायचे झाल्यास आज पर्यंत २२०० किलोमीटरपेक्षा जास्ती अंतराचे काम या संस्थेने पूर्ण केले आहे.धरणातील गाळ काढून तो शेतकºयांना देणे त्यामुळे शेतकºयांच्या जमिनी सुपीक होतील व धरणाची पाणी साठवणूक करण्याची क्षमता वाढेल हे काम महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये केल्यास पाण्याचा, तसेच जमीन नापीक होण्याचा प्रश्न निश्चितच सोडवता येईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थपाक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होत्या.अनासपुरे म्हणाले की, मराठीसाठी हक्काची चित्रपटगृहे नसल्याची खंत आहे. तसेच मल्टिप्लेक्सचे तिकीटदर हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. यावर उपाय म्हणून मराठीसाठी हक्काची चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याबरोबरच माफक तिकीट दर ठेवणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेPuneपुणे