शमा वैद्य यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

By Admin | Updated: May 28, 2015 00:42 IST2015-05-28T00:42:52+5:302015-05-28T00:42:52+5:30

संगीत-नाट्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या संगीत रंगभूमीवरील गायिका व अभिनेत्री डॉ. शमा वैद्य यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.

Shama Vaidya declares 'Balgandharva Award' | शमा वैद्य यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

शमा वैद्य यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

पुणे : संगीत-नाट्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या संगीत रंगभूमीवरील गायिका व अभिनेत्री डॉ. शमा वैद्य यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
या बैठकीस सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बीडकर, तसेच माजी आमदार उल्हास पवार, प्रतिभा मोडक, शुभांगी दामले, डॉ. सतिश देसाई आणि अनुराधा राजहंस आदी बालगंधर्व पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. या वेळी विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. अजय धनवडे (रंगभूमी), अपूर्वा भिलारे (पुरुषोत्तम करंडक, दिग्दर्शन), सदाशिव गाडेकर (नेपथ्य), राज कुबेर (दिग्दर्शन), ललिता देसाइ (अभिनय) आदी पुरस्कार्थींचा यात समावेश आहे.

Web Title: Shama Vaidya declares 'Balgandharva Award'