शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोवाडा गायला म्हणून शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 18:54 IST

राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली आहे.

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. मात्र शाहीर हेमंतराजे मावळे यांनी लाल महालासमोर पोवाडे गायले. ज्यानंतर त्यांना पोलिसांनीअटक केलीये. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कुठेही कार्यक्रम, रॅली, शोभायात्रा किंवा कुठल्याही प्रकारची गर्दी करण्यास पोलीस प्रशासनाने बंदी केली होती. या नियमाचं उल्लंघन करत शाहीर हेमंतराजे मावळे यांनी लाल महालसमोर काही साथीदारांसह पोवाडे सादर केले. येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी तिथे जमत होती. त्यामुळे मावळे हे तिथून हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली.

राज्यसरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. ज्यात पोवाडे कार्यक्रम करू नये, याचाही समावेश आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी १५ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. मात्र या पत्राला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध म्हणून मावळे यांनी आज लाल महाल समोर पोवाडे गायले.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजArrestअटकPoliceपोलिस