शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रबोधनाचा वसा जपणा-या शारदाताई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:03 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट एकपात्री प्रयोगातून उलगडून दाखविण्याचे कार्य शारदाताई मुंढे अविरतपणे करीत आहेत.

पिंपरी  - क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट एकपात्री प्रयोगातून उलगडून दाखविण्याचे कार्य शारदाताई मुंढे अविरतपणे करीत आहेत. राज्यभर सुमारे पाच हजारांहून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करून शारदातार्इंनी प्रबोधनाचा यज्ञ अखंड तेवत ठेवला आहे.‘साधी राहणी, उच्च विचार’ या तत्त्वाचा जीवनात अंगिकार करून दोन दशकांहून अधिक काळ शारदातार्इंचे प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.पिंपरीगावात राहाणाºया शारदातार्इंचे रहाणीमान अगदी साधे आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत असताना, त्यांनी कलेची आवड जोपासली आहे. छोट्या मोठ्या समारंभामध्ये त्या ‘व्हयं मी सावित्री बोलतेय’, तसेच ‘मी साहेबांची रमा’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘राजमाता जिजाऊ’ या कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट त्या एकपात्रीतून उलगडून दाखवतात. अगदी भूमिकेशी एकरूप होऊन त्या प्रयोगाचे सादरीकरण करतात.१९९० ला व्हयं मी सावित्री बोलतेय हा पहिला प्रयोग सादर केला. त्यानंतर शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व अन्य सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात वेळोवेळी प्रयोग सादर करून त्यांनी आतापर्यंत पाच हजार एकपात्री प्रयोग केले आहेत. मानधन मिळविणे हा एकपात्री प्रयोग सादर करण्यामागील उद्देश नाही.पथनाट्याच्या माध्यमातूनकारकिर्दीला केली सुरू वातपथनाट्याच्या माध्यमातून कलाकार म्हणून शारदातार्इंनी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची प्रबोधनाची वाटचाल सुरूच आहे. पिंपरीतून सुरू केलेली प्रबोधनवारी आता महाराष्टÑाच्या कानाकोपºयात पोहोचली आहे. विविध ठिकाणी जाऊन त्या एकपात्री प्रयोग सादर करतात. अंगणवाडी सेविका असल्याने शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचेही काम त्या तळमळीने करतात. सामाजिक जाणिवेची त्यांनी जपणूक केली आहे. बचत गटांना प्रशिक्षण, अशिक्षित महिलांना साक्षरतेचे धडे देण्यापासून ते अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत त्यांनी वैयक्तिक योगदान दिले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.समाजाचे प्रबोधन व्हावे, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंतची वाटचाल केली असल्याचे शारदाताई सांगतात. सुरुवातीला जेमतेम शिक्षण असलेल्या शारदातार्इंनी विवाहानंतर विविध जबाबदाºया पेलत,दहावी आणि बारावी, पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत प्रबोधनाचा हा वारसा जपण्याचा त्यांचा मनोदय आहे.

टॅग्स :PuneपुणेWomen's Day 2018महिला दिन २०१८