शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: प्रेमाचे जाळे टाकून लैंगिक शोषण; इन्स्टाग्रामवर फोटो केले व्हायरल

By भाग्यश्री गिलडा | Updated: April 20, 2024 15:33 IST

काळेपडळ परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली...

पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी शुभम बबन राठोड (वय २०, रा. साईराम कॉलनी, काळेपडळ) याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ११ एप्रिल २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत काळेपडळ परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, आरोपी हा तक्रारदार मुलीच्या मैत्रिणीच्या परिचयाचा आहे. आरोपीने तिच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली.

तसेच तिच्यासोबत प्रेमसंबंध करून आईला भेटवतो म्हणून घरी बोलावून घेतले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीचा अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोक्सो ॲक्ट तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी