लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून 'सेक्सटॉर्शन'

By भाग्यश्री गिलडा | Updated: January 6, 2024 19:37 IST2024-01-06T19:37:01+5:302024-01-06T19:37:54+5:30

महिलेने पैसे परत मागितले असता आरोपीने महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ४० हजार रुपयांची मागणी केली. 

Sextortion by a woman by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून 'सेक्सटॉर्शन'

लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून 'सेक्सटॉर्शन'

पुणे : लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेला नग्न व्हिडीओ कॉल करत पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाणेर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. 

हा प्रकार ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अमनप्रित सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री केली. लंडन येथे कमला असल्याचे सांगून महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तुझ्यासाठी गिफ्ट पाठवतो असे सांगून दिल्ली येथे पार्सल अडकल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी २७ हजार रुपये मागितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पैसे परत मागितले असता महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ४० हजार रुपयांची मागणी केली. 

याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमनप्रीत सिंग याच्यावर गुन्हा फसवणुकीचा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहेत.

Web Title: Sextortion by a woman by showing the lure of marriage

टॅग्स :Puneपुणे