पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेट उघड; परदेशी तरुणींसह मॉडेल्सची सुटका, २ एजंटांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:04 IST2017-12-23T16:00:36+5:302017-12-23T16:04:42+5:30
आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणाऱ्या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़

पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेट उघड; परदेशी तरुणींसह मॉडेल्सची सुटका, २ एजंटांना अटक
पुणे : आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणाऱ्या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़
गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये छापा घातला़ त्यात एक उझबेकिस्तान आणि रशिया येथील दोन परदेशी महिला तसेच मूळच्या दिल्लीच्या राहणाऱ्या सध्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी आलेल्या २ मॉडेल यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले़ याप्रकरणी दोघा एजंटांना अटक केली आहे़
सोव्हिएट रशियातून अनेक राज्ये स्वतंत्र झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली होती़ त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक तरुणींना नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले होते़ मध्यंतरी हे प्रकार काही प्रमाणात बंद झाले होते़ हिंजवडी येथे केलेल्या या कारवाईमुळे अद्यापही असे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट देशाभर पसरले असल्याचे दिसून येत आहे़.