शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

हिंजवडी आयटी पार्कमधील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, ७ मुलींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 8:13 PM

हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्दे२ फ्लॅटमध्ये दिल्ली, बंगाल, पंजाब, मध्यप्रदेश, नेपाळ आणि महाराष्ट्र या राज्यातील ७ मुली येणारे ग्राहक प्रामुख्याने आयटीमधील असल्याचे पोलीस तपासात पुढे या गुन्ह्यात घरमालकांवरही कारवाई करण्यात येणार

पिंपरी/पुणे  : सोशल मिडीयाचा वापर करीत ग्राहक हेरून विविध राज्यातील ७ मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या ५ एजंटांना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ७ मुलींची तेथून सुटका केली. ही कारवाई मंगळवारी रात्री हिंजवडीतील लक्ष्मी नर्सिंग या इमारतीत करण्यात आली़. कुमार बलबहादूर प्रधान (वय ४७), रणजित बलबहादूर प्रधान (वय २५, दोघे, रा. मुकाईनगर, हिंजवडी), शामसुंदर गंगाबहादूर नेवार (वय २३), बळीराम भक्ती शर्मा (वय २२) आणि बळीराम फोनी गौर (वय २२, सर्व रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. तर त्यांचा सनी नावाचा एक साथीदार फरार झाला आहे. हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. मंगळवारी (दि.१७जुलै) रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले़. लक्ष्मी नर्सिंग या इमारतीच्या २ फ्लॅटमध्ये दिल्ली, बंगाल, पंजाब, मध्यप्रदेश, नेपाळ आणि महाराष्ट्र या राज्यातील ७ मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. तसेच मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या ५ एजंटांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० हजार रुपये व ७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़. आरोपींची कसून चौकशी केली असता हे आरोपी सोशल मिडीयाचा वापर करुन ग्राहकांशी संपर्क साधायचे तसेच त्यांना मुलींची छायाचित्र पाठवून आर्थिक व्यवहार करायचे. येणाऱ्या ग्राहकांकडून त्याचा फोटो आणि आयडी मागवायचे़. त्यावरुन त्याची ओळख पटल्यानंतरच ठरलेल्या ठिकाणी मुलींना पाठवायचे. असा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सुरु होता़. यातील २ मुली या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या़. त्यानंतर येथील २ मुली निघून गेल्या होत्या़. २ मुली या वेगळ्या कामासाठी आल्या होत्या़. त्यांना इथे आल्यावर हा प्रकार समजला़. त्यांच्याकडे येणारे ग्राहक प्रामुख्याने आयटीमधील असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे़. अधिक तपासासाठी त्यांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे़. याबाबत सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, फ्लॅटमालकांनी आपला फ्लॅट भाड्याने देताना त्या वापर कशासाठी गेला जात आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे़. या गुन्ह्यात घरमालकांवरही कारवाई करण्यात येणार असून फ्लॅट सील करण्यात येणार आहेत़. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक योगिता कुदळे, व्यवहारे, नामदेव शेलार, प्रमोद म्हेत्रे, ज्ञानेश्वर देवकर, नरेश बलसाने, तुषार आल्हाट, सुनिल नाईक, कविता नलावडे, ननिता येळे, अनुराधा ठोंबरे, सचिन शिंदे व हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे़ 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानsex crimeसेक्स गुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस