खोर-वढाणे-सुपा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST2021-03-09T04:13:03+5:302021-03-09T04:13:03+5:30
मात्र याच खोर-वढाणे-सुपा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खोर मार्गे वढाणे व पुढे सुपा या ठिकाणी प्रवाशांना ...

खोर-वढाणे-सुपा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण
मात्र याच खोर-वढाणे-सुपा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खोर मार्गे वढाणे व पुढे सुपा या ठिकाणी प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून सध्या जाण्याची वेळ ही आलेली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून फुटाफुटांवर मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले गेले आहेत.
दौंड तालुक्यातील प्रवाशांना बारामती तालुक्यातील गावांना जाण्यासाठी हा अत्यंत नजीकचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते.
चौकट
खोर-वढाणे-सुपा रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र हे काम कोठे अडकले आहे कळण्यास मार्ग नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रवाशी आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाणीव नाही. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची आमची मागणी आहे.
प्रगती चौधरी (ग्रामपंचायत सदस्य, वढाणे)
फोटोओळ : दौंड-बारामती तालुक्याला जोडणाऱ्या खोर-वढाणे-सुपा रस्त्यावर पडलेले खड्डे.