दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शिक्षक व शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST2021-04-24T04:11:24+5:302021-04-24T04:11:24+5:30

या संदर्भात अधिक माहिती देताना अशोक जाधव पुढे म्हणाले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हि घोषणा केली ...

Seventh Pay Commission is applicable to teachers and non-teachers under the jurisdiction of Divyang Welfare Commissionerate | दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शिक्षक व शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग लागू

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शिक्षक व शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग लागू

या संदर्भात अधिक माहिती देताना अशोक जाधव पुढे म्हणाले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हि घोषणा केली आहे. या संदर्भात आमदार कपिल पाटील आणि पुण्यातील शिक्षक भारती संघटना यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दिव्यांग शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक व ६ हजार १५९ अन्य कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना २ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक - कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

Web Title: Seventh Pay Commission is applicable to teachers and non-teachers under the jurisdiction of Divyang Welfare Commissionerate