शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सात आरोपींच्या जन्मठेपेची शिक्षा 22 वर्षांनी रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:45 IST

कुत्रे भुंकले या कारणातून झाला होता खून

ठळक मुद्दे सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततापोलिसांनी सदर केलेला पुरावा हा पुरेसा नाही

पुणे : कुत्रे भुंकण्याच्या कारणावरुन मारहाणीत झालेल्या एकाच्या मृत्युप्रकरणी सत्र न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र तब्बल 22 वर्षानंतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच घटनेतील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  बारकू चंदर जगताप (वय 34), श्रीकांत खंडू माकर (वय 41), दत्तू सावळा भालेराव (वय 59), श्रीरंग दत्तू भालेराव (वय 29), निवृत्ती संतू यादव (वय 59), लहू दत्तू भालेराव (वय 26) आणि गेणभाऊ लक्ष्मण साठे (वय 32, सर्व रा. खुळे मुळशी) यांची सुटका करण्यात आली. 1993 साली बिरा कासकर व त्याचे नातेवाईक हे आपल्या कुटुंबासह खुळे येथे मुक्कामास आले होते. घटनेच्या दिवशी बारकू जगताप हा रस्त्याने जात असताना त्याच्या अंगावर कुत्रे भुंकले. त्यामुळे त्याने कुत्र्याला लाथ मारली व कासकर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली व जगताप याने परिसरातील लोकांना घेऊन येतो, अशी धमकी कासकर कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर जगताप हा इतर आरोपींना घेऊन आला. सर्वांनी मिळून बिरा व त्याच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली. त्यात बिरा यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.पोलिसांनी सातही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध, बेकायदा जमाव जमवून खून केल्याबाबतचे दोषारोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल केले. 1997 साली त्याची सुनावणी झाली. सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. ..................* पोलिसांनी सदर केलेला पुरावा हा पुरेसा नाही. आरोपीची ओळखपरेड न घेणे, साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या विसंगती व तपासातील त्रुटी बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपीचा बचाव मान्य करून, न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन त्यांची जन्मठेप रद्द बातल ठरविली. 22 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. पुणे सत्र न्यायालयाचा निकाल हा चुकीच्या निष्कर्षावर असून आरोपींच्या विरुद्ध काहीही पुरावा नसल्याचा बचाव आरोपींच्या वतीने अ‍ॅड. दीपक गिरमे, अ‍ॅड. नितीन देशपांडे आणि अ‍ॅड. सिद्दार्थ चपळगावकर यांनी केला. या अपिलाची सुनावणी न्यायाधीश एस. एस. शिंदे व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झाली.

टॅग्स :PuneपुणेLife Imprisonmentजन्मठेपMurderखूनCourtन्यायालयPoliceपोलिस