शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:46 PM

पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दापोडी पोलीस चौकीत घडली. पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयेश विनोद चव्हाण (वय २२), तेजस विनोद चव्हाण (वय १९, रा. औंध हॉस्पीटल क्वॉटर्स), अशोक पाचू चव्हाण (वय ५४), सुनिल अशोक चव्हाण (वय २८), शुभम अशोक चव्हाण (वय २३), ललिता अशोक चव्हाण (वय ४५, सर्व रा. संगमवाडी, खडकी) आणि किरण विशाल ननावरे (वय ३१, रा. मुळा रोड, खडकी) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. इतर १५ जण पसार आहेत.     मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून कॉल होता. यामुळे हवालदार मुंडे हे शिपाई म्हेत्रे आणि बिरारीस यांच्यासोबत जात होते. त्यावेळी दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सुशील आणि शुभम यांचे भांडण सुरू होते. ते दोघे एकमेकांना बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत नेले. यावेळी आरोपींनी पोलीस चौकीजवळ बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच हवालदार मुंडे यांंना शिवीगाळ करत जातीवाचक बोलल्याची खोटी तक्रार करून वर्दी उतरवण्याची धमकी दिली............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस