पुणो शहरात ङोंडूची सातशे टन आवक

By Admin | Updated: October 2, 2014 23:31 IST2014-10-02T23:31:27+5:302014-10-02T23:31:27+5:30

दस:यानिमित्त मार्केटयार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली.

Seven hundred tonnes of incoming inland city of Puno | पुणो शहरात ङोंडूची सातशे टन आवक

पुणो शहरात ङोंडूची सातशे टन आवक

>पुणो : दस:यानिमित्त मार्केटयार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली. विक्रमी आवक होऊनही मागणी वाढल्याने ङोंडूला घाऊक बाजारातच प्रतवारीनुसार किलोमागे 2क् ते 6क् रुपये भाव मिळाला. 
दस:यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ङोंडूसह विविध फुलांची बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक होत आह़े गेल्यावर्षी दस:याच्या आदल्या दिवशी सव्वातीन लाख किलो ङोंडूची आवक झाली होती़ यंदा त्यात वाढ झाली आहे. 
बाजार समितीकडे 4 लाख 82 हजार 255 किलो ङोंडूची आवक झाल्याची नोंद झाली आहे. तर शेतक:यांनी स्वत: सव्वादोन लाख किलो फुलांची विक्री केल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. 
गुरुवारी पहाटेपासूनच फुलांची बाजारात मोठय़ा प्रमाणावर आवक झाली होती. त्यामुळे बाजारा शेजारील पेट्रोल पंपापासून ते गेट नंबर 9 र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे वाहतूककोंडीदेखील झाली होती़ आवक वाढल्याने यंदाही बाजार समितीने भुसार विभागातील गेट क्रमांक 5 वरील रस्त्यावर विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. 
ङोंडूबरोबर गुलछडीची 5 हजार 46क् किलो, तुळजापुरी ङोंडू 5 हजार किलो, बिजली 2 हजार किलो व पांढ:या शेवंतीची 3 हजार किलो आवक झाली़ 
सोलापूर, सातारा, वाई, पुरंदर, अकलूज, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा येथून फुलांची आवक झाली़ पिवळ्य़ा ङोंडूला प्रतवारीनुसार किलोमागे 2क् ते 4क् रुपये, केशरी ङोंडू 2क् ते 6क् रुपये, तर गुलछडीला 16क् ते 25क् रुपये, बिजली 8क् ते 12क् व पांढ:या शेवंतीस 6क् ते 22क् रुपये भाव मिळाला.
पूजेसाठी लागणारे आंब्याचे डहाळे, आपटय़ाची पाने, नारळ, तुळशीची पाने, बेलपान, विविध प्रकारचे हार, दुर्वा, कमळ खरेदीसाठी भाविकांनी महात्मा फुले मंडई, तुळशीबाग व मार्केटयार्ड परिसरात गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Seven hundred tonnes of incoming inland city of Puno

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.