शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 16:51 IST

दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली

यवत : "चौफुला" असे नाव महाराष्ट्रात घेतले सर्व मराठी लोकांना आठवण होते ती लावणीची ......चौफुला येथील कला केंद्रांमध्ये अनेक लावणी कलावंत त्यांची लावणीची कला सादर करत असतात. चौफुला येथील कला केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात लावणी रसिकांच्या मनात अधिक प्रसिद्ध आहेत. वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंतांनी त्यांची कला जोपासत असताना वारीतील तब्बल ८ हजार वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था व बरोबर भक्तिगीते - लावणीचे कार्यक्रम आयोजित केले होते. 

न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करून वारीतील तब्बल ८  हजार वारकऱ्यांना कला केंद्रात जेवण दिले. मागील काही वर्षांपासून दिवसेंदिवस सदर उपक्रम आणखी मोठा आणि अधिक सेवाभावपणे कसा करता येईल,  यासाठी कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व जयश्री जाधव मोठे कष्ट घेतात. दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली.                         यवत येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पहाटे निघालेले वारकरी आठ वाजल्यांनंतर वाखारीच्या जवळपास पोहोचण्यास सुरुवात होते. तेथे न्यू अंबिका कला केंद्रात सकाळ पासूनच जेवण दिले जाते. कला केंद्रातील कलावंत जेवण तर देतात याचबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भजने भक्तिगीते व लावण्यांचा एकत्र असा जुगलबंदीचा कार्यक्रम देखील सादर करतात. यामुळे चालून चालून थकलेल्या वारकरी मंडळींना एक दुपारचा विरंगुळा देखील होतो. तर यवत ते वरवंड हा टप्पा १५ किलोमीटर अंतराचा असल्याने तुलनेने लहान असतो.यात विश्रांती घेण्यासाठी वारकरी मंडळींना वेळ मिळतो. यातच लावणी कलावंत पंढरीच्या वाटेवर त्यांना भक्तिगीते सादर करून त्यांचे मनोरंजन करतात.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी