शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पुरंदर येथील ओम शक्ती मठात सेवकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:39 IST

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील ओम शक्ती बाबा आश्रमात सेवकाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमठात मयत व्यक्तीशिवाय कुणीही राहत नसल्याने मठ बंदच रविवारी रात्री सेवक झोपेत असताना खुन

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील ओम शक्ती बाबा आश्रमात सेवकाचा खुन झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय७० रा. भरतगाव, ता. दौड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून अज्ञात इसमाकडून त्यांचा खून करण्यात आला आहे. खूनप्रकरणी जेजुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील ऐतिहासिक शिवमंदिर भुलेश्वर जवळ पूर्वेला डोंगराच्या कुशीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून डॉक्टर राजेंद्र लालचंद नहार यांनी काही वर्षांपूर्वी सात आठ खोल्यांचा ओम शक्ती बाबा आश्रम मठ बांधलेला आहे. या ठिकाणी मठाची साफसफाई देखभाल करण्यासाठी मृत दगडू टेमगिरे यांची नियुक्ती केलेली होती. मठात मयत व्यक्तीशिवाय कुणीही राहत नसल्याने मठ बंदच होता. खुनाची घटना रविवारी रात्री सेवक झोपेत असताना घडली. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील करत आहे.  

टॅग्स :PurandarपुरंदरCrimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस