शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

CoronaVirus News: कोरोना लशीसाठी ‘सिरम’ने विकला प्रकल्प; एक अब्ज लशी तयार करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:24 IST

युरोपमधील प्रकल्प

- सुकृत करंदीकर पुणे : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने त्यांचा युरोपातील उत्पादन प्रकल्प नोव्हावॅक्स या कंपनीला सुमारे १,२६५ कोटी रुपयांना (१६७ दशलक्ष डॉलर्स) विकला. सिरमकडून विकत घेतलेल्या या प्रकल्पात नोव्हावॅक्स ही कंपनी ‘कोविड-१९’ वरील लशीचे उत्पादन घेणार आहे. युरोपातील झेक रिपब्लिक या देशात असणाऱ्या ‘सिरम’च्या या उत्पादन प्रकल्पाची क्षमता वर्षाला १ अब्ज लशी तयार करण्याची आहे.

लस उत्पादनासाठीच्या अत्यंत अत्याधुनिक सुविधा या १,५०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रावरील प्रकल्पात आहेत. आता नोव्हावॅक्स या प्रकल्पात सन २०२१ पासून कोविड-१९ वरील लशीचे उत्पादन घेणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले, झेकमधल्या प्रकल्पात आम्ही पोलिओ आणि इतर लशींचे उत्पादन घेत होतो; मात्र या लशीचे पुरेसे उत्पादन घेण्याची क्षमता आमच्या नेदरलँड आणि भारतातील अन्य प्रकल्पांमध्ये आहे. झेकमधील प्रकल्प विकल्याने या उत्पादनावर परिणाम होणार नाही.

सध्या कोविड-१९ वरील लशीचे उत्पादन जगासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी नोव्हावॅक्सला उच्चनिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पाची आवश्यकता होती. युरोप आणि भारतातील अन्य प्रकल्पांमध्ये पुरेशी अत्याधुनिक उत्पादन क्षमता असल्याने झेकमधला प्रकल्प त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता जगासाठी हे लाभदायक ठरणारे आहे. - अदर पूनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट

...तर ऑक्टोबरमध्ये लस बाजारात

 ‘ऑक्सफर्ड’ची ही लस यशस्वी ठरण्याची शक्यता ५० टक्के असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. च्चाचण्या यशस्वी झाल्यास ऑक्टोबरपर्यंत लस बाजारात आणण्याची तयारी ‘सिरम’ने केली आहे.  ऑक्टोबरपासून पहिले पाच-सहा महिने दरमहा ५० लाख लशी तयार करण्याचे ‘सिरम’चे नियोजन. च्त्यानंतरही उत्पादन क्षमता १० कोटींपर्यंत वाढवण्याची तयारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे