शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यातील सातबाऱ्यावर गंभीर चुका, नोंदी दुरूस्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 19:34 IST

शासनाने शिबीर लावून सातबारे मोफत दुरूस्त करून देण्याची मराठा महासंघाची मागणी...

सासवड: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून सातबारा ऑनलाईन प्रणालीत दिला जात असताना त्यात अनेक चुका व त्रुटी राहिल्या आहेत. महसूल रेकॉर्ड दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईचा फटका नागरिकांना वर्षानुवर्षे सहन करावा लागतो आहे. सामान्य नागरिकांच्या अर्जांची दखल घेतली जात नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सात-बारा वर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने शिबिर आयोजित करून मोफत दुरूस्त करून द्याव्यात आदी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून देण्यात आले.

वारसनोंद, हक्कसोडपत्र, सात-बारा उतारा किंवा तत्सम मालमत्ता पत्रकांतील चुका दुरुस्तीची कायदेशीर तरतूद असतानाही त्या दुरुस्त्यांसाठी महसूल कर्मचारी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा अनुभव पुरंदर महसुल प्रशासनाकडून येत आहे. जमिनीची किंमत किती याचा हिशेब करून दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास संबंधित कामे प्रलंबित ठेवणे, तहसिलदार ऑनलाईन नोंदी करण्यासाठी थंब न देणे आदी कारणे सांगितली जात आहेत.

या तक्रारी व नोंदीबाबत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत "एक खिडकी योजना सेवा" ऊपलब्ध असावी अशा मागण्यांचे निवेदन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचे मार्गदर्शना नुसार पश्चिम महाराष्ट्र महासंघाचे ऊपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सासवड अध्यक्ष संदिप जगताप, सलील जगताप यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले.

पुरंदर तालुक्यात पुर्वी हस्तलिखित सातबारा उता-याचे रूपांतर आता ऑनलाईन प्रणालीमध्ये केल्याने त्यात क्षेत्र, शेतकऱ्यांचे नाव, आडनाव, आणेवारी, अपाक हिस्सा, बँक बोजा, भुविकास बँक आदी बाबीमध्ये चुका झाल्या आहेत. काही ठिकाणी सातबारा उताऱ्यावर ति-हाईतांची नावे लागली असल्याचे प्रकार घडले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड