शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Pune: शिरदाळे घाटात अपघाताची मालिका सुरूच, रस्त्याशेजारी सिमेंटकठडे बांधण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:59 IST

बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती...

अवसरी (पुणे) : शिरदाळे (ता .आंबेगाव) येथील शिरदाळे धामणी घाटात (दि.४) मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले. गुळणी (ता. खेड) येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती समजत आहे. साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजीक राहायला असणारे  धामणी येथील बाळासाहेब बोऱ्हाडे, विक्रम बोऱ्हाडे, सीमा बोऱ्हाडे यांनी दिली.

गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत, धामणी ग्रामपंचायत यांच्यावतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत  आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्यावतीने सबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. 

अपघातातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे. परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.

या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं, महिला मजूर, शेतकरी यांची कायच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देण्यात येणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.

- रेश्मा बोऱ्हाडे 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे