दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 09:10 AM2018-06-25T09:10:47+5:302018-06-25T09:11:01+5:30

पूर्ववैमनस्यावरून करण्यात आलेल्या गोळीबारात रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाला.

Serialized criminals injured in pre-emptive firing | दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी

दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी

पुणे : पूर्ववैमनस्यावरून करण्यात आलेल्या गोळीबारात रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाला. ही घटना दत्तवाडीतील शनि मंदिराजवळ मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली. सुरज भालचंद्र यशवंत (वय २३, रा. राजेंद्रनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी रोहित उथडा (रा. दत्तवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज आणि रोहित यांच्यात यापूर्वी भांडणे झाली आहेत. दोघांवरही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. रोहितचा वाढदिवस असल्याने श्रीकृष्ण मित्र मंडळाजवळ तो व त्याचे मित्र जमले होते. त्यावेळी जेवण करण्यासाठी सुरज तेथून चालला होता. आमच्याकडे का पाहतो, यावरून त्यांच्यात वाद झाला.

तेव्हा रोहितने आपल्याकडील पिस्तूल काढून आकाशात एक गोळी झाडली. ते पाहून सुरज पळू लागला. तेव्हा त्याने सुरजच्या दिशेने गोळीबार केला. गोळी त्याच्या पाठीमागे लागली. जखमी अवस्थेत सुरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरजवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, रोहित फरार झाला आहे.

Web Title: Serialized criminals injured in pre-emptive firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.