पिढीजात कुुंभार व्यवसायिकांना जातीच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:25+5:302021-04-01T04:12:25+5:30

शिरूर : शासनाच्या विविध योजनांच्या लाभ कुंभार समाजातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा, कुंभार समाजास माती वाहतूक परवाने निर्गत करण्याच्या ...

Separate camp for generational potters for caste certificates | पिढीजात कुुंभार व्यवसायिकांना जातीच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र शिबिर

पिढीजात कुुंभार व्यवसायिकांना जातीच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र शिबिर

शिरूर : शासनाच्या विविध योजनांच्या लाभ कुंभार समाजातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा, कुंभार समाजास माती वाहतूक परवाने निर्गत करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता यावी यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांचे मार्फत सर्वेक्षण करुन परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची गाव निहाय यादी करावी, पिढीजात व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र शिबीर आयोजीत करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे.

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी जगदाळे यांच्या नेतत्वाखाली २१ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पाठपुरावा सुरू होता त्याला यश आले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी यांना विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनजी जगदाळे, माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताशेठ डाळजकर, प्रदेश अध्यक्ष शामशेठ राजे, वरिष्ठ प्रदेश कार्याध्यक्ष संतोष पाषाणकर, प्रदेश उपाध्यक्ष किसन काळे, प्रदेश संघटक प्रकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष नथुशेठ कुंभार, जिल्हासचिव भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर, युवक जिल्हाध्यक्ष मयुर कुंभार, पुणे शहराध्यक्ष जालिंदर कुंभार यांच्यासह जिल्हयातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी निवेदन दिले व सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर दिनांक २५ जानेवारी२०२१ रोजी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील प्रांत आधिकारी व तहसिलदार यांना आदेश काढले. परंपरागत कुंभार समाजातील व्यक्तींची गाव निहाय यादी करावी, जातीचे दाखले असलेल्या व नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी करावी तसेच तालुक्यातील पीढीजात व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबीर आयोजीत करावे असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Separate camp for generational potters for caste certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.