शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नुसतेच फिरणे काय कामाचे ? संवेदनशीलता महत्वाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:26 IST

दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली.

पुणे : दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली असून वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासात राहण्याची संधी पर्यटक घेत आहेत. वरकरणी हे चित्र जरी सुखावणारे असले तरी पर्यटनाच्या निमित्ताने अति व्यावसायिकवृत्तीमुळे त्या पर्यटनस्थळाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे.दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. हल्ली लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता, निसर्गाच्या अभ्यासाकरिता, याबरोबरच टेÑकिंगसाठी पर्यटन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये टुरिझमची क्रेझ असली तरी त्याबरोबरच काही महत्वकांक्षी व्यावसायिकांच्या धोरणाचा फटका निसर्गाला बसत आहे.याविषयी पुरातत्व व पर्यावरण विषयाच्या अभ्यासक तसेच संशोधनाकरिता नेहमीच भटकंती करणाºया साईली पलांडे-दातार यांनी सांगितले, इतिहासाचा वारसा समजून घेण्याकरिता, विविध महोत्सव अभ्यासण्याच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्ता गावांमधील यात्रा उत्सवाचा आनंद घेण्याच्या औचित्याने भटकंती करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.यावेळी त्या पर्यटनस्थळी स्थानिकांना रोजगार मिळणे हे जरी स्वाभाविक असले तरी दुसरीकडे अतिव्यावसायिक दृष्टीकोनातून पर्यटकांची लूट होताना दिसते. विषय केवळ व्यावसायिकतेचा नसून पर्यटकांच्या बदलत्या मानसिकतेचा देखील आहे. आजकाल वाढत्या माध्यमांमुळे संबंधित पर्यटनस्थळांविषयीची माहिती तात्काळ उपलब्ध होते.पध्दतशीर नियोजन करुन तिथे भेट दिली जाते. परंतु पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा इतर गोष्टींमध्येच अधिक रमताना दिसतात. यात सर्वाधिक वेळ ते ‘सेल्फी’मध्ये घालवतात. स्वयंशिस्तीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.शासकीय यंत्रणेने काही संस्था स्थापन करुन आपली जबाबदारी झटकल्याचे पाहवयास मिळते. शासनाच्या त्या पर्यटन संस्थांकडून केवळ हॉटेलिंगचीच माहिती मिळते असा अनुभव पर्यटकांचा आहे.‘कास’चा अट्टाहास कशाला ?सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गेल्या काही वर्षांपासून कासचा बºयापैकी प्रचार-प्रसार झाल्याने त्याविषयी पर्यटकांना कुतूहल असते. मात्र त्याठिकाणी सध्या वाढत जाणाºया पर्यटकांच्या संख्येमुळे दहा वर्षांपूर्वी फुलणारी फुले आता फुलताना दिसत नाही. नाशिक-गोवा दरम्यान असणाºया पठारांवर देखील वेगवेगळी फुलं फुलतात. मात्र त्याविषयी पर्यटकांना माहिती नसल्याचे साईली सांगतात.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या