शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट तेरा तरूण तुर्कांची : सायकलवरून गाठले लोणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 20:12 IST

या अंतरात अनेक घाट होते, जीवघेणे चढ होते. मात्र न दमता एका जिद्दीने हा सगळा प्रवास पार केला. सायकल चालवणे ही सर्वांची समान आवड, त्यामुळे कंटाळा असा कोणालाही आला नाही.

ठळक मुद्देपुणे सायकल प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही चारशे किलोमीटरची मोहीम पार

पुणे : तेरा सायकली, तीन दिवस आणि चारशे किलोमीटर..,तरूणांनाही लाजवेल अशी ही धाडसी मोहीम तेरा ज्येष्ठांनी नुकतीच पार पाडली व शालेय वयापासून असलेली असलेली लोणार सरोवर पाहण्याची हौस भागवली.पुणे सायकल प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही मोहिम पार पाडण्यात आली. पुण्यातून सुरू झालेला त्यांचा सायकल प्रवास अहमदनगर, औरंगाबाद, जालना मार्गे सिंदखेडराजा व नंतर लोणार सरोवर असा झाला. चारशे किलोमीटरच्या अंतराविषयी सांगताना प्रतिष्ठानचे संस्थापक व या मोहिमेतील सर्वाधिक ज्येष्ठ असलेले दत्तात्रय मेहेंदळे (वय, ७९) म्हणाले, ‘‘या अंतरात अनेक घाट होते, जीवघेणे चढ होते. मात्र न दमता एका जिद्दीने हा सगळा प्रवास पार केला. सायकल चालवणे ही सर्वांची समान आवड, त्यामुळे कंटाळा असा कोणालाही आला नाही. उलट सर्वांबरोबर रस्त्याने एकत्र सायकल चालवणे ही मौजेची गोष्ट होती. जिद्द धरलीच तर लांबचा प्रवासही कसा सुसह्य होतो हेच यातून आम्हालाही कळाले.’’केशव जहागीरदार, विनायक माढेकर, भरत केतकर, संजय कट्टी, अरविंद चितळे, दत्तात्रय गोखले, अविनाश मेढेकेर, प्रदीप भवाळकर, पद्माकर आगाशे, डॉ. सुभाष कोकणे, तानाजी सावंत, अनिल पिंपळीकर हे या मोहिमेतील अन्य शिलेदार. सायकल प्रतिष्ठान अंतर्गत त्याची नेहमी भेट होत असते. दरवर्षी ते अशी मोहीम काढत असतात. यावर्षी चर्चेत लोणार सरोवराचा विषय निघाला व चर्चेअंती तिथेच जायचे पक्के करण्यात आले. मेहेंदळे म्हणाले, ‘‘लोणार सरोवर परिसरात मी लोणारकर-दैनंदिन एक तास हा काही युवकांचा ग्रुप आहे. त्यांच्याबरोबर ओळख झाली. हे युवक दिवसातील त्यांचा कोणताही एक तास लोणार सरोवराच्या स्वच्छतेसाठी देतात.ज्याला जमेल त्यावेळेत येऊन तो काम करतो. आपल्या परिसराचे भूषण असलेले हे पर्यटनस्थळ स्वच्छ, सुंदर रहावे हा उद्देश त्यामागे आहे. त्यांच्या या उपक्रमाने आम्ही भारावून गेलो व त्यांच्याबरोबर एक तास दिला. संपुर्ण परिसर स्वच्छ केला. त्याचा आनंद काही निराळाच होता.’’सायकल प्रतिष्ठान ही संस्था सायकल चालवणे आवडणाऱ्या कोणाचाही आहे. असा कोणीही संस्थेत येऊ शकतो, संस्थेच्या उपक्रमात भाग घेऊ शकतो. त्यासाठी वयाची, अनुभवाची अशी कोणतीही अट नाही असे मेहेंदळे म्हणाले. संस्थेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७ लक्ष्मीपूजन तपोभूमी सोसायटी, दत्तवाडी, पुणे ४११०३० येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेLonarलोणार