शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 10:44 IST

आव्हाड यांच्या जाण्याने वकील वर्गातून हळहळ व्यक्त

पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी चेअरमन ऍड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तीन ते चार दिवसांपासून उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी, असा परिवार आहे. आव्हाड यांच्या जाण्याने शहरातील वकील वर्गातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड हे त्याांचे धाकटे बंधू आहेत. केवळ वकिलीच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव आव्हाड यांची ओळख होती. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख चिंतनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्काराने गौरवले होते. विद्यार्थ्यांकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांना कायद्याचे धडे देणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक हरपल्याने पुणे शहरातील त्यांच्या वकील विद्यार्थ्यांवर आव्हाड यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या