ज्येष्ठाची फसवणूक सीसीटीव्हीत कैद
By Admin | Updated: February 11, 2017 02:37 IST2017-02-11T02:37:52+5:302017-02-11T02:37:52+5:30
येथील ज्येष्ठ दाम्पत्याच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात छबी मिळाली. मात्र तो भामटा पोलिसांच्या ताब्यात काही आला नाही.

ज्येष्ठाची फसवणूक सीसीटीव्हीत कैद
शिरूर : येथील ज्येष्ठ दाम्पत्याच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात छबी मिळाली. मात्र तो भामटा पोलिसांच्या ताब्यात काही आला नाही. सरकारी दवाखान्यात सोने दाखवून पैसे मिळतात, अशी बतावणी करून येथील ज्येष्ठ दाम्पत्यास ६० ते ७० हजारांच्या सोन्याला गंडा घालून एक जण फरारी झाला आहे.
रजिया याकुब सय्यद (वय ५५, रा. कामाठीपुरा, रा. शिरूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला पायकंदील चौकातून सरदार पेठेकडे जाणाऱ्या बोळीत भाजीपाला विक्री करते. बुधवारी (दि. ८) एक जण त्यांच्या स्टॉलवर गेला. त्याने रजिया यांच्या पतीची आस्थेने विचारणा केली.
सोने ताब्यात घेतल्यावर रेशन, मतदान व आधार कार्डच्या झेरॉक्स घेऊन येतो, असे सांगून तो याकुब यांच्यासमवेत बाहेर आला. यानंतर ‘मी नमाज पठण करून येतो’ तुम्ही थांबा असे याकूब यांना सांगून तो गेला. मात्र बराच वेळ तो आला नाही. यामुळे याकुब पत्नी थांबली तेथे आले. मात्र तो तेथेही आला नाही. यानंतर या दाम्प्त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलिसांत एका अज्ञात व्यक्तीविषयी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करणाऱ्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे. (वार्ताहर)