शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

तिकीटासाठी मिळणारी सवलत नाकारण्याकडे ज्येष्ठांची पाठ; रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:54 IST

आठ लाखांहून अधिक प्रवाशांपैकी केवळ १३ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांनीच सवलत नाकारत पूर्ण तिकीटावर प्रवास केला..

ठळक मुद्देरेल्वेला केवळ ५६ लाख रुपयांचा फायदा झाल्याची माहिती

राजानंद मोरे - पुणे : तिकीटासाठी मिळणारी सवलत न घेण्याच्या रेल्वेच्या आवाहनाकडे ज्येष्ठ नागरिकांनी पाठ फिरविली आहे. रेल्वेच्यापुणे विभागामध्ये दि. १ एप्रिल ३० नोव्हेंबर या कालावधीत आठ लाखांहून अधिक प्रवाशांपैकी केवळ १३ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांनीच सवलत नाकारत पूर्ण तिकीटावर प्रवास केला आहे. एकुण ज्येष्ठ प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्केही नाही. यातून रेल्वेला केवळ ५६ लाख रुपयांचा फायदा झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.रेल्वेकडून ६० वर्षांपुढील पुरूष प्रवाशांना तिकीट दरात ४० टक्के तर ५८ वर्षापुढील महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत गरीब रथ, गतीमान, वंदे भारत, सुविधा व हमसफर या गाड्या वगळून अन्य सर्व गाड्यांमधील सर्व डब्ब्यांमध्ये मिळते. त्यामध्ये मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, जन-शताब्दी, आणि दुरांतो गाड्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये गॅसचे अनुदान न घेण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याला सुरूवातीला चांगला प्रतिसादही मिळाला. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने जुलै २०१७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत न घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांना तिकीट काढताना सवलत घेणे व न घेण्याबाबत पर्याय दिले जातात. सवलत नाकारणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकडून तिकीटाचे पूर्ण पैसे घेतले जातात. पण रेल्वेच्या या आवाहनला प्रवाशांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पुणे विभागातील विविध स्थानकांतून एकुण ८ लाख १० हजार ३४६ ज्येष्ठ नागरिकांनी तिकीट घेतले. त्यामध्ये ७ लाख ९६ हजार प्रवाशांनी सवलत न नाकारता प्रवास केला. तर केवळ १३ हजार ७०० प्रवाशांनी सवलत नाकारत रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. एकुण ज्येष्ठांपैकी हे प्रमाण १.६९ टक्के एवढे आहे. रेल्वेने सवलत घेणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १९ कोटी ६५ लाख रुपयांची सवलत दिली आहे. तर सवलत नाकारणाऱ्या प्रवाशांकडून केवळ ५६ लाख रुपये मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. -------------------ज्येष्ठ नागरिकांच्या गिव्ह अपची स्थिती(दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९)                                                 प्रवासी            उत्पन्न (कोटीत)सवलत नाकारली                    १३,७१४            ०.५६............रेल्वेच्या आवाहनला प्रतिसाद नाहीतिकीटावरील सवलत नाकारण्यासाठी प्रवाशांना जबरदस्ती केली जात नाही. तिकीट काढताना त्यांना केवळ पर्याय दिला जातो. त्यांनी सवलत नाकारली तर त्याचा फायदा रेल्वेला होईल. त्यातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासी