शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

Dr. Hema Sane passes away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:31 IST

हेमा साने यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले

पुणे: वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख असलेल्या ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ  डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्या अविवाहित होत्या. निसर्गाशी एकरून होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. मध्यवर्ती पुण्यात, बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले. 

हेमा साने यांचा जन्म १३ मार्च १९४० रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एस्सी. पी‌एच.डी. संपादन केली. भारतीयविद्या शास्त्रातल्या एम.ए., एम.फिलपर्यंत शिक्षण घेतले. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या रहात होत्या. वाड्यात माझ्याबरोबर  चार मांजरे, एक मुंगुस, एका घुबडासह काही पक्षी राहतात आणि हेच माझं कुटुंब आहे, असं त्या सांगत. त्यांच्या घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे नव्हती. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरली, तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. वाड्यातील विहिरीतील पाण्याचाच त्या वापर करत होत्या. त्यांनी दूरध्वनी वापरला नाही. दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली. अलीकडील काही वर्षे त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरत होत्या. हेमा साने यांनी आपले हिरवे मित्र, पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका - डॉ. विनया घाटे), बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष, वा. द. वर्तक यांनी संपादित केलेल्या 'शंभरेक संशोधन प्रबंधां'तील काही प्रबंध, सम्राट अशोकावरील 'देवानंपिय पियदसी राञो अशोक' हे पुस्तक लिहिली. तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बायोलॉजी (सहलेखिका - वीणा अरबाट), इंडस्ट्रीयल बॉटनी (सहलेखिका - डॉ. सविता रहांगदळे) प्लांट, या विषयांच्या पुस्तकांचे लेखन केले. पर्यावरण , निसर्ग संवर्धन क्षेत्रातील विविध नामवंत संस्थांकडून त्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. वनस्पती शास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडीसाठी मार्गदर्शन केले.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूenvironmentपर्यावरणliteratureसाहित्यProfessorप्राध्यापकNatureनिसर्गWomenमहिला