शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 10:54 IST

सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे.....

- किरण शिंदे

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेळ आली आहे विधानसभा निवडणुकीची. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत चांगले यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील आठ जागांपैकी सहा जागांवर दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पुण्यातील तब्बल सहा जागांवर आपला दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघावर दावा केला. इतकच नाही तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला. 

तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सहा जागांवर दावा करताच शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी देखील पुण्यातील सहा जागांवर दावा केला आहे. पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे. यापूर्वी शहरात शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. सध्या शहरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असून ताकदही वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुण्यात सहा जागा मिळाव्यात असे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागावाटपावरून कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना