अक्षय बांदल यांची उपसरपंचपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:59+5:302021-09-12T04:13:59+5:30

रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी सरपंच संतोष लंघे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या पदासाठी अक्षय ...

Selection of Akshay Bandal as Deputy Panch | अक्षय बांदल यांची उपसरपंचपदी निवड

अक्षय बांदल यांची उपसरपंचपदी निवड

रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी सरपंच संतोष लंघे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या पदासाठी अक्षय बांदल यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी ग्रामसेविक एस. झेड. दरेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडीनंतर शिरूर पंचायत समितीचे सदस्य बाबासाहेब सरोदे व सरपंच संतोष लंघे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय बांदल यांचा सन्मान करण्यात आला.

निवडीप्रसंगी सरपंच संतोष लंघे, ग्रामंचायत सदस्य वैभव जगदाळे, स्वाती हराळे, जयश्री लोखंडे, प्रभावती गरुड हे सदस्य उपस्थित होते. माजी सरपंच किरण चव्हाण, चंद्रकांत वाळके, हरिभाऊ चव्हाण, संदीप लंघे, ॲड. शिवाजी लोखंडे , रामदास गरुड दत्तात्रय देशमुख आदी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते .सूत्रसंचालन निलेश लोखंडे यांनी केले.

चव्हाणवाडी - लंघेवाडी (ता. शिरूर ) ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सन्मान करताना मान्यवर .

Web Title: Selection of Akshay Bandal as Deputy Panch