Video : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचारी भिडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:55 PM2020-12-25T12:55:20+5:302020-12-25T13:36:29+5:30

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

Security guards and health workers clashed at the Jumbo Covid Center in Pune | Video : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचारी भिडले 

Video : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचारी भिडले 

Next

पुणे : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुणे शहरातील शिवाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलबाबत पहिल्या दिवसापासून वाद-विवाद सुरू झाले आहे ते आजतागायत थांबायला तयार नाही. पहिल्यांदा अपुऱ्या सुविधा, रुग्णांच्या उपचारात हेळसांड यावरून टीकेचे धनी झाल्यानंतर महापालिका व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मध्यंतरी कुठेतरी जम्बोचा गाडा रुळावर येतोय असे वाटत असतानाच अचानक महिला रुग्ण गायब झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. तसेच पगार थकवल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या जम्बोतील आंदोलनांनी तेथील समस्या संपल्या नसल्याची जाणीव करून दिली. याचदरम्यान गुरुवारी( दि. २४) जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याचे काम सुरु होते. याचवेळी कर्मचारी व सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.अद्याप तरी या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही. परंतू, हाणामारीच्या घटनेमुळे जम्बो कोविडमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

कोरोना संकटाच्या काळात जीवाची बाजी लावून काम केल्यानंतर देखील महापालिका व राज्य सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. व थकीत पगारासाठी दोन तीन वेळा आंदोलन करून देखील तसेच राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडून या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र गुरुवारी थकीत पगाराचे वाटप सुरु असताना आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काही गोष्टीवरून वादावादी झाली.त्यानंतर याचे रूपांतर हाणामारी होऊन एकमेकांना भिडले.  

माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाही... 
माणूस मेला तरी आमच्याकडे त्यांची माती करण्यासाठी पैसे नाहीत. सप्टेंबरपासून पगार मिळालेले नाहीत. आमचा परिवार कसा चालणार? पगार मागितला तर आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली जाते. पालिकेने आमच्यासाठी दिलेला 12 हजारांचा बोनसही एजन्सीने लंपास केला. नर्सिंगचे काम करणा-या कर्मचा-यांचा मानसिक छळ करुन त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला केला होता. 

सहा महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले होते. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निम्माच पगार देण्यात आला. तर, नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरमहिन्याला अवघे दहा ते पंधरा हजार रुपये हातामध्ये टेकवले जात आहेत. पूर्ण पगाराची मागणी केल्यानंतर दमदाटी, शिविगाळ केली जात असून याबाबत आवाज उठविताच रुग्णालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर काढून टाकण्यात येते.  

Web Title: Security guards and health workers clashed at the Jumbo Covid Center in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.