शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

टेकड्यांवर सुरक्षा अन् गस्त वाढविणार; चंद्रकांत पाटील यांची वन विभागासोबत आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:58 IST

टेकडीवर सायंकाळनंतर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल. अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई होईल

पुणे : ‘टेकड्यांवरील वणवे, सायंकाळनंतर फिरणारी जोडपी, अतिक्रमण आदी विषयांवर कडक लक्ष ठेवण्यात येईल. त्यासाठी वन विभागाला सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, वॉच टॉवर या गोष्टी पुरविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी महापालिकेचीही मदत घेण्यात येईल. टेकडीवर सायंकाळनंतर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल. अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई होईल,’ असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

वन विभागाच्या वन भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले आदी उपस्थित होते. म्हातोबा टेकडीवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साडेसहा हजार झाडे लावली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये तिथे आग लागली आणि तेथील अडीच हजार झाडे होरपळून निघाली. त्यामुळे पाटील चांगलेच संतापले. त्यांनी सोमवारी उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीनंतर पाटील म्हणाले, ’’म्हातोबा टेकडीवर आगीच्या तीन घटना घडल्या. त्यात अडीच हजार झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा गार्ड नेमणे, चार वॉच टॉवर उभे करणे, गवत साचू न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर वन विभागासोबत बैठक झाली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील.’’

पुण्यातील म्हातोबा टेकडीनिमित्ताने सगळ्या टेकड्यांचा प्रश्न समोर आला. सर्वच ठिकाणी सुरक्षारक्षक वाढवणे, त्यांना गाड्या देणे, त्याचे मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे. सगळ्या टेकड्यांवर हा विषय करावा लागणार आहे. टेकड्यांवर गैरप्रकार होत असेल, तर त्याला सोडले जाणार नाही, असेही पाटील म्हणाले. 

टेकड्यांवरील सुरक्षेकडे योग्य ते लक्ष दिले जाईल. त्यासाठी हवे असलेले साहित्य, मनुष्यबळ पुरविण्यात येईल. पण, पुन्हा वणवे लागण्याचे प्रकार होऊ नयेत. तिथे सायंकाळनंतर किंवा दिवसा लुटण्याचे प्रकार होतात, ते होणार नाहीत. त्यासाठी गस्त वाढविण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. गस्त असल्याने लोकांमध्ये भीती राहील. - चंद्रकांत पाटील, आमदार आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. पण, आता ८ गार्ड, गस्त घालण्यासाठी माणसं, सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी तरतूद नाही. त्यासाठी महापालिकेची मदत किंवा सीएसआर फंड घेण्यात येईल. येत्या २३ जानेवारी रोजी महापालिकेसोबत आढावा बैठक होईल. -महादेव मोहिते, उपवनसंरक्षक 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटील