शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने सलग दुसऱ्या वर्षी हुकवला गुढी पाडव्याचा वाहन खरेदीचा मुहूर्त; पुणे,पिंपरीमध्ये मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 15:55 IST

अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी तसेच गुढीपाडवा आशा मुहूर्तावर वाहन खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते.

पिंपरी : अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी तसेच गुढीपाडवा अशा मुहूर्तावर वाहन खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र कोरोनाची लाट आल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वाहन खरेदी विक्री बंद आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीचा योग ग्राहकांना साधता आलेला नाही. 

अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने तसेच कार्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन विक्रीची दुकाने देखील बंद आहेत. तसेच वाहनांची नोंदणी करून घेण्यासंदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निर्देश आरटीओला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आरटीओकडून नवीन वाहनांची नोंदणीही बंद आहे. परिणामी वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना त्यातही हौशी ग्राहकांना सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याला वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आलेला नाही.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २०१८ मध्ये तीन हजार ९५० वाहनांची नोंदणी झाली होती. २०१९ मध्ये देखील त्याप्रमाणेच नोंदणी करण्यात आली होती. मात्र २०२० मध्ये नोंदणी झाली नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी -विक्री बंद असल्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉकमध्ये वाहन नोंदणी पूर्ववत सुरू झाली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्याने आरटीओमध्ये  ५० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन नोंदणी करून घेण्यासंदर्भात शासन निर्देश प्राप्त झाला नाही. काही ग्राहकांनी वाहनांची अगाऊ नोंदणी करून घेतली. त्यामुळे त्यांना मुहूर्त साधता आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घालून दिलेले आहेत. त्यानुसार 'आरटीओ'चे कामकाज सुरू आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरgudhi padwaगुढीपाडवाcorona virusकोरोना वायरस बातम्याRto officeआरटीओ ऑफीस