शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

यंदा दहा वर्षांतील दुसरा नीचांकी साखर हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 05:44 IST

९० दिवस चालेल : ५५ लाख टनावर उत्पादन घसरण्याचा साखर महासंघाचा अंदाज

पुणे : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाची अतिवृष्टी या कचाट्यात ऊस गाळप हंगाम सापडला आहे. गेल्या दहा वर्षांतील नीचांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर हंगाम केवळ ९० दिवस चालणार आहे. साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंत घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट होईल.

देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आलेला पूर, अतिवृष्टी व गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊस क्षेत्र यामुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला फटका बसला आहे. मराठवाडा व सोलापुरात ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम ९० व कर्नाटकातील गाळप हंगाम १०० दिवस चालेल. उत्तरप्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यात आलेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०१८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे ६२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, साखर उत्पादनात ५५ लाख टनापर्यंत घट होईल, असा सुधारित अंदाज आहे. असे झाल्यास २००९-१० पासूनचा हा दुसरा नीचांकी गाळप हंगाम ठरेल. या पुर्वी २०१६-१७मधे नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. राज्यात २०१७-१८ व २०१८-१९ या हंगामात राज्यात १०७ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी राज्यात तब्बल ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. या हंगामातील साखरेच्या कमी उत्पादनामुळे शिल्लकी साखर बाजारात आणणे शक्य होईल, असे साखर संघातील अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या अकरा गाळप हंगामातील नीचांकीसन ऊस गाळप साखर२००८-९ ४०० ४६२००९-१० ६१४.४७ ७१२०१६-१७ ३७३.१ ३४२(आकडेवारी लाख टन)साखर उत्पादन व विक्रीसाखर स्थिती २०१९-२० २०१८-१९अंदाज प्रत्यक्ष स्थितीसाखर उत्पादन ५५ १०७.२स्थानिक खप ७८ ७८.५निर्यात १८ १५.५हंगामअखेरची १३.७ ५४.७शिल्लक(आकडेवारी लाख टन)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे