सेकंड होम : अंतर्गत गृहसजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:18+5:302021-06-18T04:08:18+5:30
आपल्या बजेटनुसार वरीलप्रमाणे विचार करून आपण आपलं सेकंड होम कसं सजवू शकतो हे पाहूया. १. प्रकाश ...

सेकंड होम : अंतर्गत गृहसजावट
आपल्या बजेटनुसार वरीलप्रमाणे विचार करून आपण आपलं सेकंड होम कसं सजवू शकतो हे पाहूया.
१. प्रकाश आणि खेळती हवा देणाऱ्या खिडक्या या छान बे विंडोजमध्ये आखता येऊ शकतात. या प्रशस्त खिडक्यांमध्ये बसून हातात कॉफीचा मग घेऊन निसर्गाशी संवाद साधता येतो. शिवाय या खिडक्यांमुळे वेगळे सोफे आणण्याचीही गरज नाही. वेळप्रसंगी वामकुक्षीसाठी सुद्धा ही जागा योग्यच.! अशा प्रकारच्या बैठकीमध्ये एखादा झोपाळापण घेता आला तर मग अजून काय हवं !
२. फ्लोअरिंग करताना नॅचरल स्टोनच्या टाईल्स वापरून त्यातच हलकेसे पॅटर्न दिले तर स्टोन मधील रंगछटांमुळे फ्लोअरिंग मोहक दिसते.
३. सिलिंग खूप डेकोरेट करण्याऐवजी लाकडी तुळया फिरवून त्यात दिवे बसवून घराचे छत सजवता येते. पण छताच्या या थीमला साजेसा मोहक रंग मात्र हवाच !
४. जागेचा पारिणामकारक वापर करण्यासाठी फोल्डेबल डाईनिंग टेबल, बसायला खुर्च्यानं ऐवजी बुटकी स्टूल्स असेही पर्याय आहेत. वेळप्रसंगी आऊटडोअरमध्ये फेरो कॉंक्रिटचा वापर करून एखादे कॉफी टेबलपण करता येऊ शकते.
५. फिक्या रंगसंगतीबरोबर काही दोलायमान रंगाचे घटक वापरून वातावरण निर्मिती करता येईल.
या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी डिझाईनचे आकलन असणारी आणि सुयोग्य व्यवस्थापन करणारी टीम मात्र हवी !
अर्किटेक्ट माणिक सुपेकर
व्हर्टायसेस कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ,पुणे