शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:02 PM2021-06-30T22:02:57+5:302021-06-30T22:03:31+5:30

शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करणाऱ्या संबंधित दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार

Seal a shops who selling fertilizers by increasing rates to farmers; Action in Indapur taluka | शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री करणारे दुकान सील ; इंदापूर तालुक्यातील कारवाई

googlenewsNext

बाभूळगाव:निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शेतकरी व ग्राहकांची अडवणूक व फसवणुक करणार्‍या संबंधित खत दुकानावर इंदापूर तालुका कृृषि अधिकारी भाऊ रावसाहेब रूपनवर यांनी छापा टाकला. दुकानातील सर्व मालासह संबधित दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच दुकानाचे लायसन्स रद्द करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती देखील कृृृषि अधिकाऱ्यांनी दिली.

गजकुमार हिराचंद गांधी कृृृषि भंडार असे कारवाई करण्यात आलेल्या खत दुकानाचे नाव आहे.तर प्रविण एकनाथराव बारवकर (रा.काटी, ता.इंदापूर,जि.पुणे) यांनी संबंधित दुकानदार यांच्याविरूद्ध इंदापूर तहसिलदार व तालुका कृृृृषि अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३०) या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात अतिरिक्त खत साठा आढळुन आला. यामध्ये युरीया खताच्या ९९२ बॅगा किंमत २ लाख ६३ हजार, अमोनियम सल्फेट खत १७४ बंग, किंमत १ लाख ४ हजार, १०:२६:२६ ४५५ बॅग, ५लाख ४६ हजार, २०:२०:०:१३ ९८०बॅग, २ लाख ३५ हजार, एस.एस.पी. ३८० बॅग, ५७ हजार असे सर्व मिळुन १२ लाख ५ हजार रूपयाच्या मुद्देमालासह हे दुकान २१ दिवसांसाठी सील करण्यात आल्याची माहिती तालुका कृृषि अधिकाऱ्यांनी दिली आहे.
————————————————————————
...तर दुकानदाराचे लायसन्स रद्द करणार
इंदापूर तालुक्यातील अनेक खत दुकानदार हे रासायनिक खतांचा गोडावुनमध्ये छुप्या पद्धतीने अतिरिक्त साठा करून हंगामाच्या काळात सदरची खते चढ्या दराने विक्री करत व गोरगरीब शेतकर्‍यांची फसवणूक आणि अडवणूक करून जादा पैसे घेत आहेत. सबंधित दुकानांबाबत तक्रारी दाखल झाल्यास दुकानदारांची लायसन्स रद्द करून कडक कारवाई करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका कृृृृषि अधिकारी भाऊ साहेबराव रूपनवर यांनी दिली.

Web Title: Seal a shops who selling fertilizers by increasing rates to farmers; Action in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.