मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:20 PM2020-02-01T12:20:00+5:302020-02-01T12:21:38+5:30

केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे.

Seal fanatical when Disagreeing with opinion : Governor Bhagat Singh Koshyari | मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

Next
ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : सभ्य किंवा सुसंस्कृत समाजामधील सर्व लोक हे उदारमतवादी आणि धोती-कुर्ता वेश परिधान केला तर आम्ही असभ्य आणि प्रतिगामी अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जात असल्याची टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
दखनी अदाब फाउंडेशनतर्फे ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
सभ्य समाजात उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या मंडळींना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही, म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारले जातात. किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मात्र, लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात, हा प्रश्न आहे. देश एकसंध राहण्यासाठी आणि देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
............
कलेला जातधर्म नसतो. त्यापलीकडे जाऊन साहित्य निर्माण व्हायला हवे. देशात स्वतंत्रता हवी असे आपण म्हणतो; पण इथे इतिहास विदेशी लोकांचा शिकवला जात आहे हे आपले दुर्दैव आहे.
- सत्यपाल सिंह 
.............

प्रत्येक शहर, गल्लीत साहित्य महोत्सव भरवले जात आहेत, अशी टीका केली जाते. फॅशन म्हणून लोक येतात अस म्हटलं जातं; पण दोन लोकांची मने जरी बदलली तरी पुष्कळ आहे. ज्या देशाची कला समृद्ध असते तिथली अर्थव्यवस्था सुदृढ राहते.- विशाल भारद्वाज 
............

Web Title: Seal fanatical when Disagreeing with opinion : Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.