शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भांडणे सोडविल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार; विमाननगर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:53 IST

कुणी पुढे आला तर एकेकाला ठार मारेन अशी धमकी पण आरोपीने उपस्थित असलेल्या लोकांना यावेळी दिली.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी केली सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

पुणे : भांडणे सोडविल्याच्या रागातून तरुणाला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी करण्याचा प्रकार विमाननगरमधील यमुनानगर येथे घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

तुषार राजु बनसोडे (वय १८, रा. यमुनानगर, विमाननगर), महेश बलभिम सरोदे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), आकाश सुग्रीव घोडेस्वार (वय ३१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), करण भारत सोनवणे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी विशाल कापसे (वय २१, रा. यमुनानगर, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

 आरोपी यांचे करण तुजारे याच्याबरोबर भांडणे झाले होते. ही भांडणे विशाल कापसे यांनी सोडविली होती. त्याचा राग आरोपींना होता. रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विशाल हा यमुनानगरमधील मामाच्या घराजवळ असताना आरोपी तेथे आले व त्यांनी विशालकडे पाहून हा पण होता का असे बोलून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुषार याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला. तो त्याने अडविला असता विशालच्या हातावर, मनगटावर वार केला. त्याच्या साथीदारांनी तलवारीने त्याच्या डोक्यात मारुन जबर जखमी केले. हा प्रकार सुरु असताना अनेक लोक तेथे जमले.  या लोकांना तलवार व कोयता हवेत फिरवून कोणी पुढे आला तर एकेकाला ठार करेन अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महेश सरोदे, आकाश घोडेस्वार आणि करण सोनवणे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलीस उपनिरीक्षक पिंगळे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक