तिघांच्या मृत्यूप्रकरणी स्कॉर्पिओ चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:07 IST2021-04-29T04:07:11+5:302021-04-29T04:07:11+5:30

सुरेश मारुती कदम (वय ४६ वर्षे, रा. पुनावळे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. चाकण ...

Scorpio driver arrested in connection with three deaths | तिघांच्या मृत्यूप्रकरणी स्कॉर्पिओ चालकास अटक

तिघांच्या मृत्यूप्रकरणी स्कॉर्पिओ चालकास अटक

सुरेश मारुती कदम (वय ४६ वर्षे, रा. पुनावळे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. चाकण येथील तळेगाव चौकात सोमवारी (दि. २६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान भरधाव स्कॉर्पिओने मोटारीला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात प्रफुल्ल संपत सोनवणे (वय २७ वर्षे), अक्षय मारुती सोनवणे (वय २३ वर्षे, दोघेही रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) व अविनाश रोहिदास अरगडे (वय २८ वर्षे, रा. कडूस) या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. स्कॉर्पिओ चालक व एक सहप्रवाशी असे दोघे किरकोळ जखमी झाले. महिला पोलीस नाईक स्मिता गाढवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

-----------------------------------------------------------

Web Title: Scorpio driver arrested in connection with three deaths