शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

स्मार्ट सिटी कंपनी पुण्यातील बाणेरमध्ये उभारणार ‘सायन्स पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 4:10 PM

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

ठळक मुद्देरिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी संकल्पना आणली समोर‘खेळालाच अभ्यास बनवले तर?’हा या सायन्स पार्कचा मुख्य उद्देश

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्थळ निर्मिती (प्लेस मेकिंग) उपक्रमांतर्गत बाणेर येथे आकर्षक ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या सायन्स पार्कच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने सूर्यमालेची अ‍ॅफी थिएटरद्वारे माहिती, पिन होल कॅमेरा, वैज्ञानिक खेळणी, उपकरणे, जाकतिक घड्याळ, दूरदर्शक दुर्बीण, छाया घड्याळ (सनडायल), मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा आदी गोष्टी या सायन्स पार्कची वैशिष्टे असणार आहेत.शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागा, भूखंड वापराविना पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण देखील झाली आहेत. या रिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्लेस मेकिंग ही संकल्पना समोर आणली आहे. यात औंध-बाणेर-बालेवाडी स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत बाणेर येथे हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ‘खेळालाच अभ्यास बनवले तर?’ हा या सायन्स पार्कचा मुख्य उद्देश आहे. अभ्यास करताना मुलांना कठीण वाटणारी वैज्ञानिक तत्वे, संकल्पना, नियम उरकरणांच्या आधारे मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. याबाबत स्मार्ट सिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सर्व्हे क्रमांक २३ मधील ९८२.८ चौरस मीटर क्षेत्रावर हे सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. यात  बाल, शिशू, प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा विविध गटातील मुलांना खेळांच्या माध्यमातून विज्ञान शिकवण्यासाठी विविध शास्त्रीय रचना निर्माण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मुलांना खेळण्यासाठी सी-सॉ, झोके, घसरगुंडी अशा खेळांच्या जागाही उभारण्यात येणार आहेत. या प्लेस मेकिंगमध्ये छोटेखानी कॉफी शॉप, तसेच मुलांना शास्त्रीय खेळणी, वस्तू व उपकरणांची खरेदी करण्यासाठी दुकानेही असणार आहेत. बैठकीच्या आकर्षक व्यवस्था (परगोला), चालण्यासाठी, व्यायामासाठी जागा, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या जागा तयार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञान