शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या अंतर्वस्त्रांवरदेखील  ‘‘शाळेची बंधने’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:37 IST

एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने यापुढील काळात विद्यार्थिनींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावित, इतकेच नव्हे तर स्कर्टची लांबी काय असावी, अशा जाचक अटी घातल्या आहेत.

ठळक मुद्देएमआयटीच्या गुरुकुल शाळेची सक्ती : पालक-विद्यार्थ्यांचा संताप, आगळी वेगळी नियमावली जाहीरया शाळेने अशाप्रकारच्या सुमारे २० ते २२ जाचक अटींची सक्ती केल्याचा आरोप पालकांच्या कृती समितीने शिक्षण आयुक्तांना अर्ज दिला असून, त्यावर ५९ पालकांनी सह्या

पुणे :  विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना आता कुठल्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावी याकडेदेखील शाळांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने यापुढील काळात विद्यार्थिनींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावित, इतकेच नव्हे तर स्कर्टची लांबी काय असावी, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये अशाप्रकारच्या तुघलकी नियमांची यादीच तयार केली आहे. यावर कडी म्हणजे या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.    पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर पालकांवरही अशा जाचक अटी घातल्या आहेत. चिडलेल्या पालकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घातला आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली जाहीर केली आहे. त्याहून कहर म्हणजे, या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र लिहून आणण्याची सक्ती शाळेने केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे. या शाळेने अशाप्रकारच्या सुमारे २० ते २२ जाचक अटींची सक्ती केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थिनींनी सौंदर्य प्रसाधने वापरू नयेत, टॅटू काढू नयेत, लिपस्टीक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स वापरायचे नाहीत, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत, कानातलेही जास्त मोठे नकोत आणि त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरीच असावा, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, प्रशासन आणि माध्यमांसोबत पालकांनी संवाद साधू नये आदी अटींचाही यात समावेश आहे.

 शाळेच्या डायरीत नमूद केलेले नियम-- मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावी. - लिपस्टिक, लिप ग्लास किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत.- कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही.- शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही.- विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये.दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलं आहे. मात्र, पालकांनी माध्यमांसमोर जाण्याच्या आधी शाळेशी बोलायला हवं होतं, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.

* कार्यकारी संचालक आउट आॅफ कव्हरेज एमआयटीच्या कार्यकारी संचालक सुचेत्रा कराड यांच्याशी या निर्णयाबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन सातत्याने आॅउट आॅफ कव्हरेज असल्याचे सांगण्यात आले. दुस-या बाजुला पालकांनी थेट माध्यमांशी संपर्क साधल्याबद्दल प्रशासन विभागाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते आहे. संस्थेने नियमाविषयी काही आक्षेप असल्यास पालकांना बैठकीचे निमंत्रण दिले असतानाही देखील पालक उपस्थित न झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. 

*  तीव आंदोलनाचा ईशारा पालकांच्या कृती समितीने शिक्षण आयुक्तांना अर्ज दिला असून, त्यावर ५९ पालकांनी सह्या केल्या आहेत. टेमकर यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिका- यांना शाळेवर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अधिक माहितीसाठी स्वाती कराड-चाटे यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही. शाळेवर कारवाई न केल्यास मनसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक