शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता ठराविक थांब्यांवरच थांबवता येणार स्कुल व्हॅन : पोलिसांनी ठरवले १०८ स्पॉट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 20:31 IST

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कुल बस व व्हॅनसाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शहरात एकुण १०८ थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे.

पुणे : शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कुल बस व व्हॅनसाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शहरात एकुण १०८ थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे. हे सर्व थांबे शाळांच्या परिसरात असून या थांब्यांव्यतिरिक्त बस व व्हॅनला इतरत्र थांबून विद्यार्थ्यांची चढ-उतार करता येणार नाही.महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस) २०११ चा नियम ६ मधील तरतुद आणि उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस व व्हॅनचे थांबे निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत पुणे जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची दि. ३ जुलै रोजी बैठक घेण्यात आली होती. याबैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी परिवहन विभाग, वाहतुक पोलिस, महापालिका व शिक्षण विभागाला संयुक्त सर्वेक्षण करून थांबे निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पाहणी केली, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.पाहणीमध्ये संबंधित शाळा मुख्याध्यापकांशी चर्चा करून थांबे निश्चित करण्यात आले आहेत. शाळांच्या आवारामध्ये बस, व्हॅन उभी करण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास तिथेच थांबा ठेवण्यात आला आहे. तर ज्या शाळांना जागा उपलब्ध नाही, त्यांना रस्त्यालगत वाहने उभी करण्यासाठी थांबे दिले आहेत. याबाबत संबंधित मुख्याध्यापकांकडून जागेबाबत विचारणा करण्यात आली. तसेच रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचाही विचार करण्यात आला. त्याानंतरच जागा अंतिम करण्यात आल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाहणीनंतर पुणे शहरात १०८, पिंपरी चिंचवडमध्ये ३९ तर बारामती कार्यक्षेत्रामध्ये १३ थांबे निश्चित करण्यात आले आहेत. गरजेनुसार पुढील काळातही थांबे वाढविण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या थांब्यांना दि. ३१ जुलै रोजी मान्यता दिली आहे. तर थांब्यांच्या ठिकाणी फलक लावण्याबाबत महापालिकेच्या पथ विभागाला कळविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी शहरातील अनेक शाळांसमोर रस्त्यावर व्हॅन व बसच्या रांगा लागतात. अनेकदा जागेअभावी दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होते. काही चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करून कशाही प्रकारे वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. ही बाब विचारात घेऊन बस व व्हॅनचे शाळांच्या ठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. याठिकाणीच वाहने उभी करावी लागणार आहेत. रिक्षांसाठी मात्र थांबे करण्यात आलेले नाहीत. भविष्यात त्यांना थांबे दिले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. थांब्यांमुळे बस, व्हॅनला शिस्त लागून वाहतुक कोंडीही होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेकडून फलक बसविण्याची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणtraffic policeवाहतूक पोलीस