शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी शनिवारपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:54 AM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये काढली जाणार आहे.आरटीईअंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे.पालकांनी आरटीई प्रवेशासाठी २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करायचे आहेत, प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत.पहिल्या फेरीत ज्या पालकांना अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत पुन्हा संधी देण्यात येणार आहे. प्रवेशाची दुसरी सोडत ७ व ८ मार्च या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. पालकांनी ९ मार्च ते १२ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नव्हते,त्यांना अर्ज करण्यासाठी ९ मार्च ते २२ मार्च या काळात पुन्हा संधी दिली जाणार आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक१. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी - १० जानेवारी ते २० जानेवारी२. पालकांनी आॅनलाइन अर्ज भरणे - २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी३. पहिली सोडत काढणे - १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी४. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - १६ फेब्रुवारी ते १ मार्च५. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - १६ फेब्रुवारी ते ३ मार्च६. दुसरी सोडत - ७ मार्च व ८ मार्च७. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - ९ मार्च ते २१ मार्च८. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - ९ मार्च ते २२ मार्च९. तिसरी सोडत - २६ मार्च व २७ मार्चआरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रेरहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्म दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र