शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

शाळेचे क्रीडांगण की उकिरडा! पालक संतप्त ; संरक्षक भिंतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 11:52 PM

निमसाखर येथी जिल्हा परीषदेची जुनी प्राथमिक शाळेच्या क्रिंडागणावर सध्या दररोज कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून त्यामुळे हे क्रींडागण आहे की गावचा उकिरडा आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निमसाखर : निमसाखर येथी जिल्हा परीषदेची जुनी प्राथमिक शाळेच्या क्रिंडागणावर सध्या दररोज कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून त्यामुळे हे क्रींडागण आहे की गावचा उकिरडा आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उकिरड्यावरच अनेकजण लघुशंकाही करत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.काही वर्षापूर्वी शाळेत मोठी पटसंख्या होती मात्र इंग्लिश माध्यम व खाजगी शाळा वाढल्यानंतर कल त्या शाळांकडे वळला आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गामद्ये बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी राहिले. त्यामुळे शाळेतला उत्साह कमी झाला आणि शाळेचे मैदानही ओसाड पडायला लागले. शाळेत कमी मुले असल्यामेुळे मैदानावर कुठे येणार त्यामुळे अनेक दिवासांंपासून ओस पडलेल्या या मैदानावर काहींनी थेट केर-कचरा टाकण्यास सुरवात केली. हळूहळू त्याचे ढीग वाढत गेले आणि काही दिवसांमध्ये या मैदानाला उकिरड्याचे स्वरूप आले.शाळेमध्ये सध्या ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना देखील पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. शाळेच्या स्वच्छता गृहात पाणी नसल्यामुळे त्याची दुरावस्था झाली आहे. या शाळेसाठी गेली अनेक वषार्पासुन शाळेभवती सुरक्षाभिंतीची मागणी केली होती. मात्र संबंधीताकडुन दुर्लक्ष होत आहे. ज्या भागातुन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात त्या रस्ता भागातच काही मंडळींनी कचरा टाकून उकिरडे तयार केले आहे.शाळेच्या परिसरात सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले. सीसीटीव्ही बसविल्याल त्याच्या भितीपोटी कचरा टाकणाºयांवर प्रतिबंधी बसणार आहे. त्यामुळे किमान जिल्हा परिषदेने सीसीटीव्ही मंजूर करावेत अशी मागणी होत आहे.माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावेया शाळेमधून शिकेलेल्या विद्यार्थ्यांनी राजकीय, वकीली, डॉक्टर, व्यापार अशा अनेक व्यवसायात उत्तूंग यश मिळविले आहे. त्यांनीच आता शाळेच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यायला हवा असल्याची चर्चा गावात आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विनंती केल्यानंतरही शाळेला संरक्षण भिंती बांधून दिली जात नाही की विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी कल्पना शिक्षकांमधून पुढे येत आहे. 

टॅग्स :Puneपुणे