स्कूलव्हॅन चालकावर अखेर गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 16, 2014 00:14 IST2014-11-16T00:14:59+5:302014-11-16T00:14:59+5:30

शाळेत सोडण्यासाठी घेऊन जाणा:या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या व्हॅन चालकास वारजे माळवाडी पोलिसांनी आज अखेर अटक केली.

The school driver finally filed a complaint | स्कूलव्हॅन चालकावर अखेर गुन्हा दाखल

स्कूलव्हॅन चालकावर अखेर गुन्हा दाखल

पुणो : शाळेत सोडण्यासाठी घेऊन जाणा:या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणा:या व्हॅन चालकास वारजे माळवाडी पोलिसांनी आज अखेर अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संदीप शिवाजी कुंभार (वय 3क्, रा. जयहिंद चौक, कामटेवस्ती, शिवणो) असे या चालकाचे नाव आहे. 
हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. शुक्रवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले होते. आज बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दिवाळीच्या सुटीनंतर 1क् नोव्हेंबरला शाळा सुरू झाली. त्या दिवसापासून तो त्या मुलीवर अत्याचार करीत होता. त्यामुळे मुलीला त्रस होऊ लागला. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या आईने विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर, व्हॅनचालक आरोपी तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. हे समोर येऊनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्याच्याविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबाने फिर्याद दिली होती. त्यानुसार अखेर आज आरोपीवर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेली व्हॅन जप्त करण्यासाठी, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आणि आरोपीने अन्य मुलांसोबतही असे कृत्य केले आहे काय, याबाबत तपासाची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)
 
शिवणो परिसरात राहणारी सहा वर्षाची ही मुलगी वारजे माळवाडी येथील सह्याद्री नॅशनल स्कूलमध्ये शिकते. आरोपी कुंभार याची खासगी व्हॅन आहे.
आरोपी दररोज तिला व इतर मुलांना व्हॅनमधून शाळेत सोडत असे. इतर मुले व्हॅनमधून उतरल्यानंतर आरोपी पीडित मुलीवर व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार करीत होता.

 

Web Title: The school driver finally filed a complaint