गुजर प्रशालेतील सोनाली जाधव व सलोनी केदार यांना शिष्यवृत्ती प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST2021-04-04T04:10:59+5:302021-04-04T04:10:59+5:30

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील २०२० मधील परीक्षेत सोनाली सुरेश जाधव या विद्यार्थिनीने बारावीमध्ये ...

Scholarships awarded to Sonali Jadhav and Saloni Kedar of Gujar School | गुजर प्रशालेतील सोनाली जाधव व सलोनी केदार यांना शिष्यवृत्ती प्रदान

गुजर प्रशालेतील सोनाली जाधव व सलोनी केदार यांना शिष्यवृत्ती प्रदान

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील २०२० मधील परीक्षेत सोनाली सुरेश जाधव या विद्यार्थिनीने बारावीमध्ये वाणिज्य शाखेत ९० टक्के गुण मिळवून शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर सलोनी संतोष केदारी या विद्यार्थिनीने दहावीमध्ये ९७.५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला होता त्याबद्दल दोघा विद्यार्थिनींना डॉ. सि. आर. शर्मा गुणवंत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील सोनाली सुरेश जाधव व सलोनी संतोष केदारी या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींना त्यांच्या यशाबद्दल सोनाली जाधव हिस बारा हजार पाचशे रुपये व पदक तसेच सलोनी केदारी हिला पाच हजार रुपये व पदक देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी मुरली क्रिष्णा फार्मा कंपनीचे डॉ. सत्या वडलमानी, शिरूरचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे,सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, प्राचार्य राजाराम पुराणे मार्गदर्शक शिक्षक प्रा. कुंडलिक कदम, प्रा. गुरुनाथ पाटील उपस्थित होते.

मुलींच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर,सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, विजय ढमढेरे, यांनी त्यांचे अभिनंदन केले.

--

फोटो क्रमाक - ०३तळेगाव ढमढेरे शिष्यवृत्ती

फोटो ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील गुजर प्रशालेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करताना मान्यवर.)

Web Title: Scholarships awarded to Sonali Jadhav and Saloni Kedar of Gujar School