शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेसा क्षेत्रातून अनुसुचित जमातीचे शिक्षक ठेवले दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:34 IST

आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रात २४५ शिक्षक असून त्यातील १३१ शिक्षक बिगर अनुसुचित जमातींचे आहेत.

ठळक मुद्देप्राधान्य देणे बंधनकारक होते : कारवाई करण्याची राज्यपालांकडे मागणी

पुणे : अनुसुचित (पेसा) क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये स्थानिक अनुसुचित जमातींच्या उमेदवारांना (एस.टी.) प्राधान्य देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेने शिक्षक व ग्रामसेवकांना पेसा क्षेत्रापासून दूर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या प्रकरणात लक्ष घालून राज्य शासन व जिल्हा परिषदेला यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, या मागणीचे निवेदन आदिवासी समाज कृती समितीतर्फे राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात आले आहे.राज्यपाल कार्यालयाने अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) १७ पदे स्थानिक अनुसुचित जमातीतील उमेदवारांमधून भरण्याबाबतच्या अधिसूचना केलेल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने ५ मार्च २०१५ रोजी शुध्दीपत्र व २६ जून २०१५ रोजी अध्यादेश प्रसिध्द केला आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेकडून गेल्या पाच वर्षांपासून याबाबत आवश्यक कार्यवाही केलेली नाही. आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रात २४५ शिक्षक असून त्यातील १३१ शिक्षक बिगर अनुसुचित जमातींचे आहेत. उर्वरित पदांवर स्थानिक अनुसुचित जमातीच्या उमेदवारांची नियुक्ती करून स्थानिक उमेदवारांना न्याय द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.मागील वर्षी सांगली जिल्हातून विकल्प देऊन बदली होऊन आलेल्या शिक्षकांना पेसा क्षेत्रात नेमणूक न देता त्यांचा मानसिक छळ केला. जिल्हा परिषद प्रशासनाने इतर ठिकाणी रूजू होण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. कायद्यात तरतुद असताना अनुसुचित जमातीच्या शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने यात लक्ष घालावे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसुचित जमातींच्या उमेदवारांना मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे समितीतर्फे केली आहे. -- पेसा क्षेत्रात केवळ शिक्षकांनाच नाही तर तलाठी, ग्रामसेवक,अंगणवाडी पर्यवेक्षक, आदिवासी विकास निरिक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन विकास सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, वनरक्षक, कोतवाल, वन निरिक्षक, लॅब अटेंडंट, पोलीस पाटील, अशा सतरा पदांवर स्थानिक अनुसुचित जमातीच्या उमेदवारांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेने शिक्षक व ग्रामसेवक पदाच्या नियुक्तीबाबत शासनाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे समितीतर्फे राज्यपाल कार्यालयास निवेदन पाठविण्यात आले आहे.- सिताराम जोशी, संस्थापक संचालक, आदिवासी समाज कृती समिती

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकGovernmentसरकारEducationशिक्षण