भंगार व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:48+5:302021-03-04T04:18:48+5:30

पुणे : भंगार व्यवसायाच्या येथील कामगारांमध्ये दहशत माजवून व्यावसायिकाच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या सराईत गुंडाला ...

Scavenger arrested for extorting ransom | भंगार व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुंडाला अटक

भंगार व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुंडाला अटक

पुणे : भंगार व्यवसायाच्या येथील कामगारांमध्ये दहशत माजवून व्यावसायिकाच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या सराईत गुंडाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

जालिंदरसिंग अजितसिंग कल्याणी (वय ५२, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार शुभम सातपुते (रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामटेकडी औद्योगिक परिसरातील रोक्येम ग्रीन एनर्जी या कंपनीजवळ १ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच व २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी रामटेकडीमधील एका व्यावसायिकाने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाच्या येथील कामगारांमध्ये जालिंदरसिंग कल्याणी याने धारदार हत्याराने दहशत माजवली. फिर्यादी यांना भंगाराचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर रोज ६ हजार रुपयांची मागणी केली. हत्याराच्या जोरावर फिर्यादींच्या टी शर्टच्या खिशातील १२ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक पोटवडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Scavenger arrested for extorting ransom