शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

रानमळावस्ती येथील पुलाचे काम रखडल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:28 AM

इंदापूरकडे जाणारे आवर्तन रोखणार : शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यात होतेय अडचण

रावणगाव : खडकवासला कालव्यावरील रावणगाव रानमळावस्ती (ता. दौंड) येथील पूल कोसळून वर्ष उलटले तरी त्या पुलाचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थ होणाºया त्रासाला कंटाळून इंदापूर तालुक्याकडे जाणारे पुढील आवर्तन रोखण्याच्या तयारीत आहेत. येथील शिर्सुफळ तलावालगतच्या नवीन मुठा कालव्या वरील किलोमीटर १३७ / ४०५ हा सिमेंटी पुल ४आॅक्टोबर २०१७ रोजी अचानक कोसळल्याने परिसरातील शेतकºयांना ऊसा सह मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

हा पूल कोसळल्यामुळे साधारण दहा ते पंधरा हजार टन ऊसाचे क्षेत्र गाळपाअभावी रखडले आहे. या परिसरातील ऊस बाहेर काढण्यासाठी सहा ते सात किलो मीटर अंतर पार करावे लागत आहे. आजी - माजी आमदारांनी भूमिपूजन करून देखील या पुलाचे काम अजून झालेले नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन व पाटबंधारे विभागाला निवेदने देऊन ही प्रत्यक्ष कामास सुरवात होत नाही. पाटबंधारे विभागा तर्फे काम मंजूर असून के. पी. शिंगाडे या ठेकेदारास काम दिले आहे.शिंगाडे पाण्याचे आवर्तन चालू असल्याचे सांगून पुलाचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहे.या परिसरातील शेतकºयांना दैनंदिन प्रवास करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून कठडे नसलेल्या अतिशय अरुंद पुलावरून प्रवास करावा लागत आहे. या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे यासाठी या परिसरातील शेतकºयांनी अनेक वेळा खडकवासला पाटबंधारे विभाग सिंचन भवन पुणे, खडकवासला पाटबंधारे उपविभाग दौंड, पाटबंधारे शाखा रावणगाव यांना वारंवार निवेदने देऊन देखील सदर पुलाचे बांधकाम होत नसल्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर पुलाचे बांधकाम चालू न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे.खडकवासला कालव्याद्वारे सध्या दौंड , बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी आवर्तन चालू असून, हे आवर्तन बंद होताच सदर ठेकेदारास पुलाचे बांधकाम त्वरित चालू करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात येणार आहेत.- सुभाष शिंदे, सहायक अभियंता श्रेणी २,खडकवासला पाटबंधारे शाखा रावणगाव. 

टॅग्स :Puneपुणे